पुकार संस्थेच्या माध्यमातून आम्ही कळवा येथील जय भिम नगर कचरावेचक महिलांचा अभ्यास हा विषय रिसर्चसाठी निवडला होता. अकरा महिन्याच्या कालावधीत आमच्या गटाने या विषयावर रिसर्च केला आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक सुख दुःखाची माहिती गोळा केली. ग्रॅज्युएशन इव्हेंट नंतर आमच्या विषयाला घेऊन आम्हाला एडवोकेसी करण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यामुळे ज्या महिलांकडून आम्ही माहिती घेतली ती माहिती आम्ही त्या महिला आणि त्यांच्या मैत्रिणी यांना एकत्र करून सादर केली. आणि त्यांना व त्यांच्या मुलांना कसे शिक्षित करता येईल, कसे सक्षम होता येईल यावर चर्चा करून जनजागृती करण्यात आली. तसेच त्यांची मुले ही कशी पुकार सोबत येऊन वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करू शकतात या बदल माहिती दिली. माहिती देऊन झाल्यावर आमच्या कामाबद्दल त्यांचा अभिप्राय घेतला.