कल्याण मधील युवा गतीविधींचा अभ्यास
युवा संशोधक :
१)राहुल गणेश मानकर.
२)रितेश दिलीप घोणे.
३)सचिन विष्णू माळगावकर.
संशोधन प्रकल्पाची पार्श्वभूमी :
कल्याण शहर हे एक मेट्रो सिटी म्हणून जरी ओळखीची नसली तरी आहे. इथल्या वेगवान होणाऱ्या डेवेलोप्मेंत्स मुले शहराच्या इतिहामुळे सगळ्यांच्या नजरेत मात्र नक्कीच आहे. एकदाचे आयुष्य खूप चांगले जाणवते. इकडे मुंबई सारखी प्रचंड नाही पण दरवळ नेहमीच असते म्हणून हे शहर खूप जिवंत वाटते. ठाणे जिल्ह्यातील दुसरे महत्वाचे असे हे शहर आहे. कल्याण ला खूप महत्व असून कल्याण भोवतालची अनेक छोटी मोठी गावे व शहरे बाजारपेठेसाठी कल्याणवर अवलंबून आहेत. त्यामुळे शहराची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे. कल्याण हे एक एका रेसिदेन्तिअल अरिया सारखे आहे त्यामुळे गजबज मधेही संती वाटते. या शहरात सर्व बेसिक सोयी सुविधा उपलब्ध आहे . आपल्याला इकडे शोप्पिंग मौल, सिनेमा गृहे, हॉटेल्स, शाळा कॉलेग, वैदिकीय सुविधा सगळे उपलब्ध आहे. या शहरात एक वेगळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, शैशिनिक वातावरण आहे. त्यामुळे ह्या वातावरणाच परिणाम सगळ्यांवर नक्कीच होतो. हे शहर म्हणावं कि गाव म्हणाव कि उपनगर माहित नाही कारण हे शहर खूप मोठ आहे पण आजूबाजूच्या गावांमुळे व शहराच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे हे शहर गावासारखे वाटे पण खर तर हे खूप आयडियल असे उपनगर आहे. जिथे गावाच्या संस्कृतीचा व शहराच्या अत्याधुनिक सेवा सुविधांचा एकदाच अनुभव घेता येतो.
पुकारच्या युथ फेलोशिप च्या माध्यमातून मागील काही वर्षे आम्ही आम्ही वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि संशोधन करत आहोत. त्यामध्ये कल्याण च्या इतिहास, युवकांचे मैत्री विषयाचे दृष्टीकोन, युवकांचे प्रेम विवाह बद्दलचे मत, युवकांवर होणारा मोबाईल चा परिणाम अश्या गेल्यावेळेस विषयांवर संशोधन केले आहे. ह्यावर्षी पुकार कडून अँडव्हान्स रिसर्च करायची संधी मिळाली आणि मग विषयाला शोधण्यास सुरुवात झाली. आमच्या मागील संशोधन प्रकाल्पन्मधे युवा हे आमचे मुख्य घटक होते आणि त्यामुले आम्हाला यूथ बाबद आमच्या कॉम्युनिटि कार्यक्रमांमुळे अधिक महिती मिळवता आली .या मागील प्रकाल्पन्मधे असे जाणवले की येथीस युवकांवर त्यांच्या संस्कृती, परंपरा, कुटुंब, सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थितीचा परिणाम आहे आणि हा परिणाम आपणास त्यांच्या कृती तून दिसतो. मग ह्याच मुद्याला घेऊन रिसर्च करण्याचे ठरले. पण हा विषय ठरायला खूप वेळ लागल कारण अँडव्हान्स रिसर्च ला योग्य असा विषय असणे गर्गेचे होते. नंतर काही दिवसांच्या अभ्यासानंतर तसेच राहुल आणि मतियाझ या दोघांसोबत झालेल्या चर्चेनंतर मग कल्याण मधील युवकांच्या अक्तीवितीस वर प्रोजेक्ट करण्याचे ठरले. त्याद्वारे आम्हाला युवकांच्या स्वप्नंच, भवितव्याचा वेध घ्यायचं होता. शहर हे शिव जयंती, आंबेडकर जयंती, गुढी पाडवा, गणपती सारख्या सार्वजनिक कार्याक्रमसाठी प्रसिद्ध आहे ज्यात मुख्य म्हणजे युवकांचा जास्त हातभार असतो. तसेच येथे कुस्ती व कब्बडी सारखे खेळ आज खेळले जाऊन त्यांना प्रोत्साहन भेटत आहे. एकदाच्या संस्कृती चा एकदाच्या जीवनाशी खूप संबंध आहे. म्हणे शेवटी हाच विषय घेऊन आम्ही शहराबद्दल व वेग वेगळ्या युवा कृतीन बबड माहिती गोळा कार्यास सुरुवात केली. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्या नंतर आम्ही हि माहिती लोकां बरोबर शेअर करण्याकरिता ब्लोग्स बनविण्याचे ठरविले. व शहराच्या इतिहासाबद्दल माहिती गोळा करण्यापासून कामाला सुरुवात झाली. माहिती अधिक चांगली होण्या करिता आम्ही फोटोग्राफी व पर्सनल इंटरव्हू घेणाचे ठरवले. व उशिरा का होयीना पण कामाला सुरुवात झाली.
उपक्रमाची काही ठळक उदीष्ट्ये :
- कल्याण परिसरातील युवकांच्या वेग वेगळ्या गतीविधींचे दस्तयेवजीकरण म्हणजे माहिती संग्रहित करणे.
- खेळ सामाजिक कार्य संस्कृती मनोरंजन करियर शिक्षणाशी संबधित युवा गतिविधींची माहिती संग्रहित करून त्यांचा युवांच्या जीवनाशी असलेला संबंध जाणून घेणे.
- तसेच युवा गतीविधींचा त्यांच्या संस्कृती, परंपरा, कुटुंब, राजकीय व सामजिक वातावरण तसेच इतिहासाशी असालेला संबंध जनेन घेणे.
- युवकांच्या सध्याच्या गतीविधीतून त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या स्वप्नांचा व कल्याण सारख्या उपनगरात त्यांना मिळणाऱ्या सेवा सुविधांचा वेध घेणे.
एकुण आम्हाला युवक हे एक मध्यम म्हणून वापरून कल्याण शहराच्या जीवनाचा व येथील सोयी सुविधा तसेच येथील सर्व प्रकारच्या वातावरणाचा अभ्यास करायचा होता व या सगळ्याच युवकांच्या सद्य व भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करून ते मांडण्याचा प्रयत्न करायचा होता.
माहिती गोळा करण्याचे माध्यम:
१) वैयक्तिक मुलाखती व प्रश्नावली
आमच्या संशोधन प्रकल्पामध्ये माहिती गोळा करण्याचे योग्य तंत्र कोणते वापरायचे हे एक आव्हान होते कारण या तंत्रा मूळेच नंतर आम्हाला युवकांच्या गतीविधींचा, त्यांच्या परंपरा व संस्कृती व त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घ्यायचा होता व त्यासाठी योग्य माध्यम असणे गरजेचे होते म्हणून आम्ही खोल माहिती मिळवण्याकरिता पर्सनल मुलाखती घेवून त्यांच्या वयक्तिक गोष्टी जाणून घेतल्या त्य साठी आम्ही त्यांची सर्व्म्हिती मिळवण्याचा पर्यंत केला. या प्रश्नावली बबड माहिती पुढे देत आहोत.
- मुलाखत घेतलेल्या व्यक्तीचे नाव
- सध्या राहत असलेले ठिकाण
- त्यांचे वय
- युवक आपल्या आयुष्यात त्यांचे शिक्षण व काम असे काय करत आहेत ?
- त्यांच्या मुख्य आवडी काय आहेत ?
- ते कोणत्या गतीविधींमध्ये व्यस्त आहेत ? कुठे आणि का ?
- ते त्यांच्या या आवडी बद्दल काय सांगतात ? या आवडीची सुरुवात कशी झाली ?
- त्यांच्या या आवडी व कृती मागची पाश्वभूमी काय आहे ?
- युवक सध्याच्या कृती मध्ये काही सफलता मिळू शकले का ?
- युवक त्यांच्या भावी आयुष्याबद्दल काय विचार करतात ?
- युवक सध्या ज्या कृतींमध्ये व्यस्त आहेत तेच त्यांचे करियर आहे का ?
- युवकांच्या आशा- आकांशा, त्यांचा एखाद्या गोष्टी मध्ये असलेल्या रस, आवड या मध्ये पालकांची, मित्रांची व समाजाची काय भूमिका असते ?
- युवकांच्या हॉबिस, करियर याला वळण लावण्या करिता कल्याण शहरातील परिस्थिती सेवा-सुविधा यांचा काय परिणाम होतो?
- युवक आपल्या गतीविधी, कृती, हॉबिस यांचा संबंध शहराच्या सामाजिक आर्थिक, राजकीय, शैक्षणिक बाबींशी कसा लावतात व त्याचा परिणाम त्यांच्या सद्य गतिविधींवर व आवडी निवडींवर कसा पडतो ?
- युवक आपल्या आवडी निवडी व गाडीविधीबाबाद किती आवेशपूर्ण आहेत व ते अजून काय माहिती देतात.
२) फोटोग्राफी
दुसरी आणि अधिक महत्व्याची वापरण्यात आलेली पद्धत म्हणजे फोटोग्राफी होय. कारण आमच्या संशोधन पद्धती मध्ये माहिती साठविण्याकरिता व समजण्याकरिता दृश्य माहिती अधिक उपयोगाची होती कारण या मुळे युवकांच्या प्रत्यक्ष गतीविधी लगेच समजत येतात. कल्याण मधील संस्कृती, परंपरा यांच्याशी संबधित माहिती फोटो व व्हिडिओ क्लिप्स मुळे या गोष्टी अधिक मनोरंजक पद्धतीने संग्रहित केल्या जात होत्या म्हणून या प्रकल्प मध्ये शक्य तेवढे फोटो काढण्याच प्रयत्न केला गेला आहे.
उदाहरण साठी महेश भागात चे उदाहरण योग्य वाटते कारण बर्याच लोकांनी कुस्ती बघितलेली नसते ते फक्त ऐकून असतात. त्यामुळे कुस्ती संबंधित माहिती गोळा करताना कुस्ती च्या क्लिप्स असणे व फोटो असणे गरजेचे असते.
३) ग्रुप डिस्कशन :
या संशोधन पद्धतीमुळे आम्हाला अनेक कोलेज ग्रुप्स बबड माहिती गोळा करता आली. ग्रुप चे एकंदरीत अनुभव व विचार संग्रहित करण्यासाठी हि पद्धत महत्वाची आहे.
गोळा करण्यात आलेल्या माहितीची सूची :
नहीं, नाम स्थान एम / एफ आयु क्रियाएँ
हेमंत चिपळूणकर- कल्याण (ई)-देओलेकार वाडी नाटकामधे काम करण्याची खूप आवड आहे.
सिद्धेश जळगावकर कल्याण (ई)-सिद्द्थार्थ नगर कब्बड्डी प्लेयर आहे
हर्षद जळगावकर- कल्याण (ई) – सिद्द्थार्थ नगर M 21 क्रिकेट, मॉडलिंग, मध्ये खूप रस आहे .
परेश घोडके कल्याण (डब्ल्यू) – संतोषीमाता रोड २१ सांस्कृतिक रांगोळ्या व चित्र काढायल आवडते.
सौरभ कल्याणकर कल्याण (W) सापाड-21 कुंभार वाडा मूर्तिकार आहे.
महेश भगत. कल्याण (प.) 24 कुश्ती प्लेयर है.
मिलिंद पाटिल कल्याण (ई) – लोकग्राम शिक्षक असून सामाजिक उपक्रम राबवतो.
सुशांत चौधरी कल्याण (ई)-कोळसेवाडी 25 कामाला जातो व सामाजिक कार्यात सहभागी असतो.
संदेश पाटिल कल्याण (W)-अहिल्याबाई चौक. 25 कोरियोग्राफर आहे व स्वताची डान्स संस्था आहे.
सनी चोव्हान कल्याण (W)-सुभाष मैदान. 19 हिप हॉप, बी बोयिंग डान्स करतो.
जयेश चिपळूणकर कल्याण (ई)-सिद्धार्थ नगर. 21 एम प्रिंटींग तेक्नोलोजी शिकत आहे.
सचिन चौधरी कल्याण (ई)- राजकारणात जायचे आहे.
वैभव गाडेकर कल्याण (W)- शंकर राव चौक. वह 25 मीटर ज्वेलरी तयर करतो व स्वतःचा व्यवसाय आहे.
प्रसाद धुरी कल्याण (W)-बेतूरकर पाडा 20 सॉफ्टवेयर इंजीनियर आहे.
सुशांत नागेश कल्याण (ई)-दत्तवाडी 19 एम उन्होंने Interiour डिजाइनरिंग चा कोर्स करत आहे.
फारुख शेख कल्याण (W)-पारनाका M 23 घोड़ा गाड़ी चालवतो.
लक्ष्मीकांत म्हात्रे कल्याण (W)-खडकपाडा 22 एम बोडी बिल्डर आणि पोसर है.
पंकज कांबळे कल्याण (W)-तिलक चौक 18 एम फुटबाल खेळायला आवडते.
इब्राहिम शेख कल्याण (ई)-आनंद वाडी 22 एम ऑटो रिक्षा चालक आहे
मुरलीधर गावली कल्याण (W)-20 एम अंसारी चौक, कल्याण पुलिस इंस्पेक्टर बनायचे आहे.
हेमेंद्र भोगले कल्याण (ई)-परशुराम वाडी 20 एम क्रिकेट मध्ये रस आहे..
सुनील जोशी कल्याण (W)-25 नाट्यमंदिर मीडिया रिपोर्टर आहे
राजेश राणे कल्याण (W)-सिद्धार्थ नगर 25 एक डॉक्टर आहे.
निकिता देवरुखकर कल्याण (ई)-तिसगाव १८ तिला मेहँदी व ब्युटी पार्लर मध्ये इंटरेस्ट आहे.
रीना गवयी कल्याण (ई)-तिसगाव 19 कविता लिहिते .
वृषाली जांभळे कल्याण (W)-कुंभार वाडा 23 हि सिविल द्राफ्त्स्मान चा कोर्स करत आहे.
कॉलेज सोनावणे कल्याण (W)- स्ट्रीट प्ले उपक्रम.
साकेत कॉलेज कल्याण समूह (ई)-चिंचपाडा . एन. एस. एस. द्वारे स्ट्रीट प्ले उपक्रम
शिवले कॉलेज कल्याण शिवले एन. एस. एस. द्वारे स्ट्रीट प्ले उपक्रम
बाबसाहेब आंबेडकर जयंती कल्याण (ई)-सिद्धार्थ नगर युवा आयोजित रैली,
गुढी पाडवा सिंदिकॅते , कल्याण (प.) गुढी पाडवा- हिंदू नाव वर्ष उत्सव आहे.
शिव जयंती कल्याण (ई)-सिद्धार्थ नगर और शिवाजी चौक (प) शिव जयंती मध्ये, मुख्य आकर्षण रैली आहे.
माहितीचे संस्लेषण आणि विश्लेषण :
गोळा करण्यात आलेल्या माहिती मध्ये एकूण 26 वयक्तिक मुलाखती आहेत . त्यामध्ये 23 युवक आहेत व 3 युवती आहेत .
युवक : 23
युवती : 03
या मुलाखती मधील १२ युवकांच्या मुलाखती ह्या कल्याण पूर्व या विभागातील आहेत
व उर्वरित ११ मुलाखती ह्या कल्याण पश्चिम विभागातील आहेत
तसेच माहितीतील दोन मुली ह्या कल्याण पश्चिम विभागातील असून १ मुलगी ची मुलाखत हि कल्याण पूर्व विभागातील आहे.
त्यांचे वय : माहितीतील युवक हे सादाहरण १८ ते २५ वयोगटातील आहेत.
ऐतिहासिक स्पर्श:
आम्हाला असे जाणवले कि या शहराची ऐतिहासिक पाश्वभूमी या शहराच्या जीवनावर खूप परिणाम करते. या शहरात कुंभार वाद, दुर्गाडी, सुभेदार वाडा, शिवाजी चौक असे महत्वाची ठिकाणे आहेत, कि ज्यामुळे कल्याणला महत्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक वातावरणात येथे अनेक संक्रुतिक उपक्रम होतात. त्यामध्ये शिवाजी जयंती, आंबेडकर जयंती, गुढीपाडवा अश्या सणांचा सहभाग आहे. या सांस्कृतिक वातावरणात. अनेक युवा हे अश्या उपक्रमात सहभागी होतात. अशी संस्कृती येथे युवकांना राजकारणात, सामाजिक कार्यात भाग घेण्यास भाग पाडतात. याच वातावरणात ते त्यांची जीवनाची मुल्ये निश्चित करतात.
गावातील संक्रुतीचा युवकांवर परिणाम.
विभिन्न स्थान – शहराच्या जवळील ग्रामीण भाग. व त्याची संस्क्रुती.
वेगवेगळ्या ठिकाणाची संसृती व परंपरा वेगळी असल्याने शहराच्या ठिकाणी व गावाकडील ठिकाणी वेगवेगळ्या उवा गतीविधी आढळतात. कल्याण च्या भोवती सापड, उंबर्डे असी छोटी छोटी गावे आहे या गावांमधील युवक हे आपला वेळ कब्बड्डी, कुस्ती असे खेळ खेळतात. तसेच ते त्यांच्या पारंपारिक, संक्रुतिक गोष्टीत पण मनापासून सहभागी होतात. घरच्यांकडून पुढे युवकांना मिळालेली संस्कृती हे युवक मनापासून पुढे सुरु ठेवतात. याच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे युवकांना एकत्र येण्याची संधी मिळते. या युवकांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटतो. पण गावांमध्ये मुलींना अवधेपण स्वतंत्र मिळत नाही. त्याचे भवितव्य त्यांचे पालक निर्धारित करतात.
या गावांमधील खेळ, मनोरंजनाची साधने, भाषा, जीवनशैली, यावर त्या त्या गावाच्या संक्रुतीचा परिणाम असतो.
शहरातील युवक :
शहरातील युवक हे आपल्या संस्कृती, परंपरेशी जास्त निगडीत कृती मध्ये सहभागी वाटत नाही. पण तरीही ते सामाजिक उपक्रम जसे आंबेडकर जयंती, शिव जयंती, गुढी पाडवा अश्या गोष्टीत सहभागी आहेत. येथील युवकांच्या गतीविधी ह्या त्यांच्या करियर शी संबंधित आहेत. येथील युवक कब्बडी मध्ये खूप सहभागी आहेत. ते अनेक मित्र मंडळांमध्ये सहभागी आहेत. त्या मार्फत ते अनेक उपक्रमात सहभागी होतात, गणपती महोत्सव, नवरात्री, असे अने उप्फ्राम ते राबवतात.
येथील युवक नृत्य, अभिनय मध्ये खूप रस दर्शवितात. हिप होप, फुटबाल, क्रिकेट, मोडेलिंग, अक्टिंग, अश्या अनेक उपक्रमात सहभागी आहेत.
कोलेज आणि जीवन.
आम्ही एकूण चार कोलेज चा अभ्यास केला. त्यात सोनावणे कोळेग व साकेत कोलेज हे मुख्य क्लायन शहरातील असून १ कोलेज शिवले या गावातील आहे. तसेच आम्ही ठाणे येथील एन.क. टि. टि. या महविद्यालयातील परिस्थिती सुद्धा जाणून घेतली व तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला.
शहरातील कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा ह्या जास्त असून त्यामुळे ते स्वतःला जास्त डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात व तश्या त्यांना संधी सुद्धा मिळतात पण तरीही शहर हे ठराविक संधीच उपलब्ध करून देतात व त्यामुळे त्यांना आयुष्यात आपल्या अशा आकांश मध्ये बदल करावे लागतात.
गावाकडील कॉलेग मध्ये शिक्षणाची क्वालिटी चांगली आहे पण ते त्यांची कला, ज्ञान यांचा चांगला विकास करू शकतील अशी कॉलेज येथे नाही आहेत.
माहितीच्या आधारे काढलेले काही ठळक निष्कर्ष:
- कल्याण नाधील युवा हे संक्रुतील, पारंपारिक, गतीविधींमध्ये सहभागी आहेत.
- या युवकांची इच्चा व आकांश ह्यावर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, कुटुंबाचा, परिणाम असतो
- युवकांवर कल्याणमधील राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबींचा परिणाम होतो.
- युवकांच्या सद्य हालचाली ह्या कल्याण मधील जीवनशैली व जीवनाला दर्शिवतात.
- कल्याण सारख्या छोट्या शहरात युवक हे अनेक संधींना मुक्तत करत त्यांना माहिती खूप कमी वेळा भेटते त्यामुळे त्यांच्या काळ्या, कौशल्य, व वागणुकीवर त्याचा परिणाम होतो. .
- या शहरामध्ये मुलींच्या गतीविधी कमी आढळतात.

