कचरा कामगारांच्या मुलांचे स्वप्न

कचरा कामगारांच्या मुलांची स्वप्न हा विषय निवडण्यामागचे कारण असे की, एकंदर कचरा कामगारांचे आयुष्य, त्यांच्या समस्या, प्रश्न असे विविध पैलू माहीत असल्याने व त्यावर आधारित असलेले हेवेदावे. कचरा कामगारांची फसवणूक, दलालांची दादागिरी, वाढती गुंड प्रवृत्ती या सर्व गोष्टी डम्पिंगच्या भोवती फिरत आहे आणि म्हणून त्यांच्या मुलांचे स्वप्न तपासण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याचे ठरवले. एकंदर नवीन पिढी काय विचार करते, स्वत:ला कुठल्या ठिकाणी पाहते याचा हा उलगडा आहे.
ही चिमुकली मुले अशा भयंकर वातावरणात राहत असतात तरीसुद्धा त्यांच्या चेहर्यावर भय नसते. भविष्यात त्याची प्रकृती व स्थिती काय असेल या बाबतीत त्यांना काही एक ठावूक नसते. म्हणून हा कचरा कामगारांच्या मुलांचे स्वप्न हा विषय हाताळण्याचे ठरवले.
ही लहान मुले स्वप्नात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण कशा होतात याचे चित्र पाहत असतात. परंतु त्यांच्या स्वप्नात स्वत:ला घेऊन त्यांच्या सभोवतालची एकंदर परिस्थिती व वातावरण याला घेऊन स्वप्न पाहत असतात. कारण त्यांचे विश्व हे डम्पिंग, टीव्ही, मोबाइल फिल्म यांच्याभोवती फिरत असते. जसे की स्वप्नात मोबाइल रिपेअरिंग, डान्सर, सिंगर मेकॅनिक, एसी व रेफ्रिजरेटर मेकॅनिक अशा प्रकारचे ध्येय त्यांच्या समोर असतात. म्हणजे स्वप्नात ते स्वत:चे भविष्य अशा विविध माध्यमात पाहत असतात.
अशा परिस्थितीत आम्ही एक प्रश्नावली तयार केली. त्यात स्वप्नांवर आधारित काही प्रश्न त्यामध्ये विचारले. एकंदर त्यांच्या लाइफस्टाइल यावरून उघड होते. ज्याप्रकारे एक मुलगा फिरोज. हा 9 वर्षाचा असून त्याचे असे म्हणणे होते की, सर मी आज खूप पुढे असतो परंतु माझ्या आईवडिलांमुळे मी आज शाळेत नाही. कारण माझ्या आईवडिलांनी मला एका जागेवर ठेवले नाही. त्यामुळे आता मी निश्चय केली आहे की, आता येथून काही झाले तरी निघायचे नाही. स्वत:चे घर झाले आहे. तोडले तरी चालेल. येथे राहून शिकून मोठा होईन.
सध्या मी गॅरेजमध्ये काम शिकत आहे. त्याचे असे म्हणणे आहे. जिथे मी काम शिकत आहे तिथे मला पोलीस आल्यावर लपवून ठेवतात. मी रिक्क्षा व टू व्हिलर गाड्यांची कामे शिकलो आहे. ग्रीसींग, तर खोलणे, टचअप देणे इत्यादी या लहान वयात या लहान मुलाने जी कला संपादन केली आहे ती कुठल्या एनर्जीतून संपादन केली आहे. हे आपण समजू शकाल नाही. त्याला वातावरण जबाबदार आहे. म्हणजे ती मुले यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसतात. परंतु संगत, वातावरण येणार्या अडचणी पायी त्यांच्या मार्गावरून भरकटतात. असे प्रकर्षाने जाणवते. ही मुले स्वप्नात जे बघतात ते सत्यात उतरवण्याचे प्रयत्न करतात.
त्याचबरोबर काही मुले स्वतःला जी स्वप्ने (दृष्य) दिसते. उदा. स्थळ, जागा, व्यक्ती, त्यांच्या विभाग काम करण्याची जागा यामध्ये स्वतःचा अंत बघतात. हे स्वतःचा अंत का बघतात ते सांगणे कठीण आहे. परंतु खूप त्यांच्या मनात भिती असते. हे सत्य आहे. त्यांच्या स्वप्नात ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी, घटना स्वतःवर लागू करतात. म्हणजे एखादा गोष्टी दिवसभर पाहतो, बघतो, जगतो त्या गोष्टी त्यांना झोपत (स्पप्नात) आठवतात. व ते त्याप्रमाणे जगत असतात.
खरं तर ते स्वप्नात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी इतरांना व त्यांना काय वाटते. त्यांच्या भविष्यात ते स्वतःला घडताना व मिठताना पाहतात. त्यांच्या प्रमाणे स्वप्न म्हणजे एक छोटी फिल्म असते. ती 3 तासांची नसून काही मिनिटांची असते. ह्या मुलांना स्वप्नात परिस्थितीशी झगडताना दिसतात. स्वतःला शोधतात व ओळखतात. त्यांच्या आयुष्यात खूप छान गोष्टी घडणार आहेत असा भास होत असतो. स्वतःला हवा तेव्हा हिरो किंवा डान्सर, पोलीस तर कधी उद्योगपती समजतात. कारण त्यांच्या वागण्यावरून असे दिसते की त्यांना एकदा छोट्या बिजनेस (धंदा) लावण्यासाठी कोणी सांगावे लागत नाही. कधी बटाटे उकडून धंदा लावणे. तर कधी चणे शिजवून ते विकणे, तर कधी रगडा करून विकणे तर कधी डंम्पिंग वर मिळणारे केक, आपले कुरकुरे, वेफर आणतात व स्वतःच्या वस्तीत विकतात.


यावरून असे दिसते की ह्यांना काही गोष्टी स्वतःहून समजत असतात. कधी स्वतःला कमी समजत नाहीत. स्वतःसाठी स्वतः संधी तयार करतात. संधीची वाट बघत बसत नाहीत.
स्वतःच्या आयुष्याला सुंदर बनवण्यासाठी ते स्वप्न बघतात. त्यांना फक्त दुःख असते की आम्ही स्वप्न बघतो ती कधी सत्यात उतरणार याचे अंतर त्यांना माहित नसते. परंतु ते स्वतःशी काही हितगुज करत असतात. त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह बघण्याचा प्रयत्न चालू असतो. खूप विचलित अवस्थेत त्यांचे मनाचे कार्य चालू असते. त्यांना जर का चांगले वातावरण, पोषक आहार, चांगले मित्र भेटले तर ते खूप चांगला विचार करतील व स्वतःकडे फक्त पॉझिटिव्ह नजरेने बघतील.
विचार करा ते अशा परिसरात राहतात तिथे गुंडांचा, तडीपारी कापनारे, मर्डर, चोर इत्यादी प्रकारचे लोकांचा सहवास असतो. भय म्हणजे काय ह्या वस्तीत राहिल्यावर समजते. इथे बर्याच गोष्टी या स्वतःला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत असता परंतु ही लहान चिमुरडी मुले स्वतःबद्दल, घराबद्दल, मित्रांविषयी, वस्तीविषयी विचार करताना दिसतात. ह्यांना भिती असते पण व नसते पण सारखे असते. कारण रोज त्यांच्या समोर काहीना काही घटना घडत असतात. तरी सुद्धा स्थिर असतात. त्यांचे खेळने, काम करणे, शिकणे हा प्रकार चालू असतो. दैनंदिन जीवन तसेच चालू असते.
परंतु एक आहे ते स्वप्न स्वतःचे दुःख विसरण्यासाठी (डिप्रेशन) घालवण्यासाठी म्हणून हे स्वप्न बघतात. ज्या गोष्टी शक्य नसेल त्या स्वप्नात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जरी त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी त्यांच्या प्रयत्नांसमोर सर्व गोष्टी लहान आहेत. गरिबीशी भांडता येते परंतु परिस्थितीशी भांडता येत नाही. जो व्यक्ती स्वप्न बघतो तोच स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. स्वप्न बघा! व सत्यात उतरवा.

कचरा कामागारांच्या मुलांचे स्वप्न
देवनार डम्पीगं वर काम करनारी मुले काय बोलतात हे आम्ही सांगण्याचा प्रयन्त केला आहे. ह्या सर्व मुलांची जात पाहता मुस्लिम वर्गाची आहेत. कारण आम्ही निवड्लेला विभाग हा रफ़िक नगर आहे त्यात जास्त मुस्लिम लोक राहतात. आम्ही पस्तिस मुलांची मुलाखत घेतली आहे. हया मुलांचे वयोगट साधारण आठ ते सोहळा पर्यंत आहे. त्यामधे प्रत्येकाशी व्यक्तीगत संवाद साधला आहे. पंरतु सांराश मध्ये सांगायचे झाले तर त्याच्या स्वप्नांना उजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
Rag pickers Boy’s dreams
| Age | Total boy’s | Religion | Education/
Drop out |
|
| 8 to 10 | 08 | Muslim | 04 | 04 |
| 11 to 12 | 11 | Muslim | 06 | 05 |
| 13 to 16 | 16 | Muslim | 09 | 07 |
| Total | 35 | 35 | 19 | 16 |
डम्पीगंवर दिसणारी स्वप्ने…
डम्पीगं वर ह्या मुलांना जास्तीत जास्त लोखंड,तांबा,पितल,फ़ुगा (प्लास्टीक) मिळाले असे भाकीत होते.व ते भेटावे अशी मनोमान ईच्छा असतॆ.त्याच बरोबर डम्पीगंवर आलेल्या नोटा, धान्य, लेस-कुरकुरे, केक हे आम्हाला जास्त भेटावे अशी इच्छा असते ते भेट्ल्यावर मी त्याच्या पासुन पैसा कमवणार व विकणार.
भविष्याचा वेध
स्वप्नात स्वताचा भविष्यावर जास्त भर असतो. ते स्वप्नात त्यांना काय आपण आहोत. व काय बनणार ते कसे बनलो आहे. त्यामुले कुनाला जलस होत आहे. ह्या गोष्टी खुप पुढे जाऊन पाहतात.त्याच्या मते आम्ही जर पुढे गेलो तर काहिना आमच्या वर खुन्नस ठेवतात. ते सुध्दा ते बघतात. स्वताला आयुष्यात जे बनायचे आहे. ते बनलेले आहे.
घर, मोबाईल, साईकल, गाडी, ईत्यादी मीलाले तर…………
त्यांच्या नुसार त्यांच्या स्वप्नात त्यांना चांगले पक्के घर असावे, मोबाईल असावा. व सायकल असावी अशा प्रकारचे त्याच्या मनात स्वप्न येत असतात. काहिना त्यातिल बर्य़ाच गोष्टी भेटतात. मोबाईल, सायकल चे पार्ट्स व गाड्यांच्या काचा, स्टेरिंग, ईत्यादी मिलतात. अश्या प्रकार ची स्वप्न पाहतात. व प्रत्यशाःत त्यांना ते भेट्ते पण काय करणार तर ते त्यापासुन काहि वापर करता येईल का? असा विचार करतात व वापरतात.
जर मी श्रीमंत असतो तर………..
मुलांना प्रश्न केला असता जर तुम्ही श्रीमंत असता तर तुम्ही आपल्या वस्ती साठी काय केले असते?
ह्या प्रश्णावर त्यांना सर्वाना आपल्या वस्तीसाठी काहीतरी करण्याची धडपड दिसली. कोनी शाळा बांधणार, तर कपडे वाटणार, तर कोणी खाऊ (खाण्यासाठी वस्तु) खेळणी अशा प्रकारच्या आपला हातभार आम्ही समाजासाठी लावु. अशी इच्या प्रतेकाने व्यक्त केली.
भिती ची सावली……….मनात घर करुन बसली आहे.
त्यांच्या मते आमच्या विभागात कधी ही कोनी कोणाला मारु शकतो. व घरी शिरु शकतात. त्यामुले जर आम्ही घरात एकटे असताना कोनी शिरले तर ते आम्हाला मारतील अशी भिती मनात घर करुन बसली आहे. त्याच्याबरोबर तेथील गुडांपासुन आमच्या जीवाला धोका आहे. कधी कचरा वेचत असताना आम्हाला बुलडोजर ने उडवले, तर कधी गाडी खाली करताना कचर्याच्याढीगारा खाली दबलो तर कधी काट्येवाला चे मुलै आम्हाला मारतात ते कधी तलवार ने तर कधी जिवे मारतात. अशा अनेक प्रकारच्या भिती मनात घर करुन बसल्या आहेत. “२२/०६/२०१० आजचे एक उधारण मुजंम्बील च्या भावाने रात्री स्वप्नात बोटल वाला मार डालेगा म्हनुण ओरडत होता. त्याचे आई वडील त्याला उठवत होते. काय झाले तरी तो मुलगा तेच बडबडत होता. म्हनजे आपण विचार करु शकता कि मुलै कैती घाबरलेली असतात.”

